हिंदू खाटीक समाजाच्या स्मशानभूमी वरील अतिक्रमण २४ तासात नाही काढल्यास बेमुदत धरणे आंदोलन - उपोषणकर्त्याचा इशारा

 हिंदू खाटीक समाजाच्या स्मशानभूमी वरील अतिक्रमण २४ तासात नाही काढल्यास बेमुदत धरणे आंदोलन करणार -उपोषणकर्त्याचा इशारा




उदगीर -हिंदू खाटीक समाजाची उमा चौक उदगीर सर्व्हे नं 299/1 मधील नगरपरिषद मालमत्ता क्र.4-2-326 (जुना)व 4-3-522(नवा) येथील सदरील जागा हि हिंदू खाटीक समाजाची स्मशान भूमीची आहे याचे असंख्य पुरावे देऊन व सलग ६ ते ७ वर्षांपासून पाठपुरावा करूनहि हा प्रश्न प्रशासन सोडवत नसून .तहसीलदार यांनी अतिक्रमण 24 तासात हटविण्याचे आदेश नपा मुख्याधिकारी यांना दिले मात्र मुख्याधिकारी  शासनाच्या  आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत. हिंदु खाटीक समाजातीलच कांही समाजकंटकांनी व इतर धर्मातील कांही गुंडगीरी करणारे या जागेवर जबरदस्तीने आपली दुकाने थाटून बसले आहेत.

 याच जागेचे खोदकाम करून पाहिले तर आपले पूर्वज व अनेक समाज बांधवांचे अवशेष सापडतील. या मागणीसाठी  समाजाच्या वतीने अनेक निवेदने तहसीलदार,लोकप्रतिनिधी,ते भारताचे महामहिम राष्ट्रपती यांच्यापर्यंत सादर केले पण हा प्रश्न सोडवण्यापेक्षा याचा मलिदा खान्यावरच भर प्रशासनाचा दिसतोय.

पण नगर पालिका यावर कुठलीच कार्यवाही करत नसल्यामुळे आज दि. २१ जानेवारी रोजी हिंदु खाटीक समाज्याच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्या मार्फत मा.महामहिम राष्ट्रपती, भारत सरकार यांना निवेदन देऊन २४ तासाच्या अता अतिक्रमण काढावे व हिंदु खाटीक समाजाच्या स्वाधीन करावे अन्यथा शासनाने हि जागा ताब्यात घ्यावे असे आशयाचे निवेदन देऊन अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. जर नगर पालिकेने २४ तासाच्या आत कार्यवाही नाही केल्यास उद्या दि. २२. जानेवारी २०२१ पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहिर केले आहे.

या उपोषणासाठी  निवेदनकर्ते भानुदास साबणे योनी पुढाकार घेतला असून सोबत आनंद साबणे, शिवाजी रुदानंदे, राधाकिशन डोंगरे, सतिश साबणे, बालाजी बुये, जगन्नाथ कांबळे, व्यंकट साबणे, व्यंकट बुये, संदीप साबणे, महादेव घोणे , नागेंद्र साबणे, रवी खडके, विनायक  टोंपे, अमर टोंपे, सुनील डोंगरे, संतोष डोंगरे, प्रशांत साबणे,हिरालाल साबणे, अनिल सदानंदे, महादेव साबणे आदींच्या सहया आहेत.

या अमरण उपोषणास पाठिंबा अखिल भारतीय सेनेचा  असल्याचे आश्वासन जिल्हा संपर्क प्रमुख विश्वनाथ गायकवाड, गाडी लोहार समाज, बसव मंटपचे राजकुमार बामणीकर यांनी दिले आहे.