पोलिस प्रशासनाच्या विंनतीवरून पत्रकारांचे तिर्डी आंदोलन तात्पूरते स्थगित
उदगीर :-. उदगीर येथील अनेक रस्त्यावरील अतिक्रमना मुळे सामान्य जनतेस रस्त्यावरून चालणे अवघड झाले असून, रस्त्यावरील अतिक्रमण प्रशासनाने काढावे म्हणुन अनेक निवेदन दिले, बातम्या लिहून सुद्धा काहीच होत नसल्याने पत्रकाराना प्रशासनास जागे करण्यासाठी तिरडी आंदोलन करावे लागत असून या आंदोलनात सर्व जनते नी अणि सामाजिक संघटनानी शामिल व्हावे असे आवाहन जेष्ठ पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर यांनी केले होते.
पण दि.१९ जानेवारी रोजी झालेल्या कांही कंठक जमावाने उदगीर शहरात दगडफेक करून तणावाचे वातावरण निर्माण केले होत यामुळे उदगीर शहरात व परीसरात जनतेमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तणाव नियंत्रीत करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करत ऍडीशनल एस.पी. हिम्मत जाधव यांनी यंत्रणा आपल्या ताब्यात घेऊन कामाला लागले व दगडफेक करण्याचा शोध घेत आहेत. पोलिस प्रशासनावर दडपण आले आहे.
पोलिस प्रशासनाच्या वतीने पत्रकारांचे आजचे होणार्या तिर्डी आंदोलनास संरक्षण द्यावे लागते पण दगडफेकीचे मुख्य आरोपींना पकडण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लावलेली असून त्यांचा शोध घेत आहे यामुळे पत्रकारांच्या आंदोलनाला स्वतंत्र पोलिस बंदोबस्त देणे आवघड होत आहे व या आंदोलनाचा पुन्हा कोणीतरी समाजविरोधी व प्रशासन विरोधी कांही कंठक या आंदोलनाचा दुरउपयोग करून उदगीर शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू शकतात यासाठी पोलिस अधिक्षक, उपपोलिस अधिक्षक व उदगीर शहरचे पोलिस निरीक्षक यांनी पत्रकारांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे व आपले आंदोलन कांही दिवसासाठी स्थगित करण्याची विनंती केली व तसे पत्र दिले.
यामुळे सर्व पत्रकारांच्या वतीने पोलिस प्रशासनाच्या विनंतीस मान देऊन सहकार्य करण्यासाठी व उदगीरतील तणावाचे वातावरण दूर होई पर्यंत कांही दिवसासाठी तिर्डी आंदोलन रद्द करण्यात आले आहे.