आर.पी. एन्टरप्रायजेस सील

  आर.पी. एन्टरप्रायजेस सील




उदगीर - उदगीर शहरामध्ये राजकीय आशिर्वाद मुळे कांही कब्जेबहादरांची चलती चालत असून शासकीय, निमशाकीय जागेवर उदगीर नगर परीषदेतील तत्कालीन नगराध्यक्ष व  कांही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नमुना.न.८ च्या माध्यमातून जागा वाढून दिली जाते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे  उमा चौक येथील कलाल लोकांच्या स्मशानभूमीच्या जागेवर चुकीचे नमुना नं. ८ देऊन कांही कब्जेबहाद्दर अतिक्रमण केले आहेत.  शह सैलानी नगर ,वड्डर गल्ली येथे एकाच्या नमुना न . ८ वरील १० फुट वाढवून दिल्यामुळे नगर पालिकेचे  २० फुट रोड आता  चक्क १३ फुटावर आले आहे. असे उदगीरमध्ये बरेच प्रकरण असून उदगीर नगर पालिकेच्या डोळ्याखाली अंधार आहे की काय ? असा प्रकार दिसत असल्याचे उदगीर शहरात चर्चा चालू आहे.

याचे ताजे उदाहरण म्हणजे उदगीर नार पालिकेचे  संकूल सुनील ट्रेड सेंटर ने बीओटी तत्वावर सन २००७ साली बांधकाम पूर्ण करून गाळे विक्री केली. त्याच काळात  सुनील ट्रेड सेंटर येथे सय्यद रजीयोद्दीन उस्ताद हा व्यक्ती  ऑफिस बाय म्हणून कार्यरत होता. सय्यद रजीयोद्दीन. उस्ताद याने मालकाचा विश्वास संपादन करून कार्यालयीन कामकाज पहात होता. मालकाने टाकलेल्या विश्वासाचा घात करत  खोटे कागदपत्रे तयार करून आपला चुलत भाऊ बाहोद्दीन उस्ताद यांच्या म्हणजे आर.पी. एन्टरप्रायजेसच्या मालकास मालकी हक्क दिले. बनावट नाहरकत पावती, बनावट  अग्रीमेंटच्या आधारे बाहोद्दीन उस्ताद हे 'ए ' वींग येथील ३, १२, १३, १४ , १५ हे पाच गाळे गेल्या १२ वर्षापासून आपल्या ताब्यात घेतली होती.  नगर पालिका व आर.पी. एन्टरप्रायजेसच्या मालकाचे भांडण हे सन २०१४ ते २०१७ पर्यंत जिल्हा सत्र न्यायालयात प्रकरण चालू होते. बाहोद्दीन उस्ताद हे कोर्टात खोटी कागदपत्रे सादर करून मालकी हक्क दाखण्याचा प्रयत्न करत होता पण कोर्टने सुनील ट्रेड सेंटरच्या बाजूने निकाल देऊन नगर पालीकेला दणका दिला व जिल्हाधिकारी यांच्याकडे मध्यस्थी करून योग्य निर्णय देण्याचा आथिकार दिला.  पण  बाहोद्दीन उस्ताद यांनी राजकीय दबावाचा वापर करून गेल्या तीन वर्षापासून कब्जा करून बसले होते. पण सुनील ट्रेड संटरचे मालक दिपक पाटील यांनी हार न मनता पाठपुरावा करत राहिले व  वर्षाच्या शेवटी मुख्याधिकारी भरत राठोड यांनी बाहोद्दीन उस्ताद व मुलगा शकी बोद्दीन उस्ताद यांच्या नावे दुकाने खाली कऱ्याची नोटीस दिली. पण शकी बोद्दीन उस्ताद हे उदगीर येथील जिल्हा सत्र न्यायालयात नगर पालिका व सुनील ट्रेड सेंटरच्या विरुद्ध गेले व आपणच मालक असल्याचा दावा केला.पण बनावट कागदपत्रे सादर करून न्यायालयाची दिशाभूल केली व मालकी हक्कातील कागदपत्राची पुरावे सादर न केल्यामुळे उदगीर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने  काल दि. १५ जानेवारी २०२१ रोजी नगर पालिका व सुनील ट्रेड सेंटरच्या हक्कात निकाल देऊन दुकाने ताब्यात देण्याचे आदेश नगर पालिकेला दिले.  यावर तात्काळ कार्यवाही करत सकाळी नगर पालीकेचे मुख्याधिकारी भरत राठोड हे अतिक्रमण विभाग पथकास सोबत्त घेऊन  आर.पी. एन्टरप्रायजेसच्या पाच दुकानास  सील केले व  शकी बोद्दीन उस्ताद यांना दोन दिवसात दुकान खाली करा अन्यथा सामान ताब्यत  घेण्यात येईल अशी सूचना केली.