लातूर जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना* *विमा कंपनीने तातडीने संभाव्य नुकसान* *भरपाईच्या २५ टक्के रक्कम अदा करावी,*

 लातूर जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना*

*विमा कंपनीने तातडीने संभाव्य नुकसान*

*भरपाईच्या २५ टक्के रक्कम अदा करावी,*

*जिल्हा प्रशासनाकडून विमा कंपनीला अधिसूचना

*पालकमंत्री अमित देशमुख यांनी तूर पिकाची* *पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई* *मिळवून देण्याची केली होती सूचना*

  अतिवृष्टी आणि त्यानंतर वातावरणात झालेल्या बदलामुळे लातूर जिल्ह्यात तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात शेतकऱ्याकडून आलेल्या तक्रारीची दखल घेऊन राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने एकूण पीक परिस्थितीचा आढावा घेऊन तूर उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने संभाव्य नुकसानीच्या २५ टक्के रक्कम तातडीने अदा करावी, अशी अधिसूचना काढली आहे.

     या संदर्भातील अधिक माहिती अशी की, लातूर जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतात पुराचे पाणी घुसून नुकसान झाले तर काही ठिकाणी जास्त काळ पाणी साचून राहिल्याने नुकसान झाले. तुरीच्या पिकाला जास्तीचे पाणी सहन न झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी हे पीक वाया गेले, अतिवृष्टी नंतर हवामानात झालेल्या बदलामुळेही उभ्या तुरीच्या पिकाचे खराटे झाले आहेत. या संदर्भातील माहिती आणि तक्रारी प्राप्त झाल्यानंतर लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला या संदर्भाने पहाणी करून वस्तुस्थिती जाणून घेण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन तसेच कृषी विभागाने आढावा घेऊन हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अहवाल तयार केला आहे.

  या वर्षी तूर पिकाचे वार्षिक सरासरीच्या ५० टक्क्यापेक्षा कमी उत्पादन होणार असल्याचे त्यात नमूद केले आहे, सरासरी ५० टक्केपेक्षा कमी उत्पादन होणार असल्यामुळे संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करावी अशी अधिसूचना लातूर जिल्हाधिकारी यांनी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड मुंबई यांना केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून अंतिम कापणी अहवाल आल्यानंतर त्वरित विम्याची रक्कम ही त्यांना मिळणार आहे

Popular posts
आर.पी. एन्टरप्रायजेस सील
Image
हिंदू खाटीक समाजाच्या स्मशानभूमी वरील अतिक्रमण २४ तासात नाही काढल्यास बेमुदत धरणे आंदोलन - उपोषणकर्त्याचा इशारा
Image
जिल्ह्यात सातवी आर्थिक गणनेचे काम असमाधानकारक असल्याने पुनर्गणना करण्यात यावी -जिल्हाधिकारी पृथ्वीराज पी. बी.
Image
आधार कार्डची नवीन नोंदणी व नुतनीकरण केंद्र वाढवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून मा.उपजिल्हाधिकारी साहेबांना निवेदन.
Image